शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पीडित मुलीच्या भेटीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुग्णालयातच झोपल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:48 IST

दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली सरकारमधील महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी यासंदर्भात पोलिसांना नोटीस जारी केली होती. तर, सरकारने ही कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, पीडित मुलीवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयाबाहेरच स्वाती मालीवाल यांनी अंथरुन टाकल्याचं पाहायला मिळालं. 

दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला, मात्र आरोपी मोकाटच होता. आता, त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या भेटीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी रुग्णालयात गाठले होते. मात्र, पोलिसांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुलीची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे, स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयाबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. रात्रभर त्यांचं आंदोलन सुरुच होतं, त्यांनी रुग्णालयातच अंथरुन टाकून रात्राची झोप घेतली. आज दुपारी त्यांनी रुग्णालय सोडलं, मात्र मी पुन्हा रुग्णालयात धरणे आंदोलनासाठी येणार असल्याचंही सांगितलं.  दिल्ली पोलीस गुंडांची पोलीस आहे. कुकर्मातील आरोपींना अटक करण्यासाठी हे पोलीस लायक नाहीत. मला पीडित मुलीची भेट घेऊन तिच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना, याची खात्री करायची होती. पीडितेला मदत आणि कायदेशीर संरक्षण देण्याचा माझा प्रयत्न होता, असेही स्वाती मालीवाल यांनी म्हटले.  

दरम्यान, १ ऑक्टोबर २०२० रोजी पीडित मुलगी वडिलांच्या निधनानंतर आरोपी व्यक्तीच्याच घरी राहात होती. आरोपीने नोव्हेबर २०२० ते जानेवारी २०२१ अल्पवयीन पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. त्यातून, ती युवती गर्भवती राहिली होती. त्यानंतर, आरोपी अधिकाऱ्याच्या पत्नीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी दिल्ली सरकारने दखल घेत चौकशी करुन आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलagitationआंदोलन