शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- भाजपा आमदारासमोर मुलाची व समर्थकांची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 09:35 IST

भाजपाच्या आमदारासमोर त्यांच्या मुलाने व समर्थकांनी गुंडगिरी करत टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची  घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

पाटणा- भाजपाच्या आमदारासमोर त्यांच्या मुलाने व समर्थकांनी गुंडगिरी करत टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची  घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. मथुरामधील बलदेव विधान सभेचे भाजपा आमदार पूरन प्रकाश यांच्या मुलाने आणि समर्थकांनी मंगळवारी मथुरेजवळील राष्ट्रीय महामार्ग 2 वर मधुवनमधील टोल नाक्यावर टोल कर्माचाऱ्यांशी अरेरावी केली. इतकंच नाही, तर त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. हा प्रकार घडत असताना तेथे भाजपा आमदार पूरन प्रकाशही उपस्थित होते. 

यासगळ्या घटनेवर भाजपा आमदाराने मात्र स्वतःची काही चूक नसल्याचं म्हंटलं. टोलनाक्यावरून जात असताना माझ्या गाडीच्या पुढे माझी सिक्युरिटी गाडी चालली होती. टोलनाक्यावर मी असलेली गाडी आल्यावर टोलकर्मचाऱ्याने बॅरिकेट्स टाकले. तो बॅरिगेट्सचा धक्का माझ्या गाडीला लागला. माझ्या गाडीवर मोठ्या अक्षरात 'आमदार' हा शब्द लिहिला होता, तरीही टोलकर्मचाऱ्याने बॅरिकेड्स टाकला, असं भाजपा आमदार पूरन प्रकाश यांनी म्हंटलं. 

 

भाजपा आमदार पूरन प्रकाश टोलनाक्यातून भरधाव वेगाने बाहेर पडताना दिसत आहेत. टोल बूथवर गाडी पोहचल्यानंतर बॅरिकेड्स पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो आहे. बॅरिगेड्स पडल्याने तो गाडीला घासतानाही दिसतो आहे. काहीवेळानंतर गाडी पुढे जाऊन थांबताना दिसते आहे. त्यानंतर गाडीतून भाजपा आमदार पूरन प्रकाश, त्यांचा मुलगा, ड्रायव्हर व स्टाफ बाहेर पडताना व टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. धक्कादायक म्हणजे  टोलकर्मचाऱ्यांना मारहाण होत असताना हा संपूर्ण प्रकार भाजपा आमदार तेथे थांबून पाहत आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार 13 फेब्रुवारी रोजी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

याआधीही भाजपा आमदार पूरन प्रकाश यांच्याकडून अशा प्रकारची घटना घडली आहे. 29 ऑक्टोबर 2016 रोजी पूरन प्रकाश यांचा टोलकर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. त्यावेळीही त्यांच्या समर्थकांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यावेळीही त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश