VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:29 IST2025-06-27T17:28:21+5:302025-06-27T17:29:27+5:30

हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधिशांसमोर हजर झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे...

VIDEO a man attended the High Court hearing from toilet seat Strange incident in Gujarat video goes viral | VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल


साधारणपणे कोरोना काळापासून संपूर्ण जगभरात 'वर्क फ्रॉम होम' कल्चर वाढले आहे. महत्वाचे म्हणजे, न्यायालयांतही ऑनलाइन सुनावणी होऊ लागली आहे. मात्र अनेक वेळा कॅमेऱ्यात काही असे दृष्य कैद होतात, ज्याचा कधी कुणी विचारही केलेला नसतो. आता गुजरात हाईकोर्टातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे.
  
हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधिशांसमोर हजर झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, ही घटना २० जूनची आहे. न्यायमूर्ती नीरज एस देसाई यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी 'समद बॅटरी' नावाच्या व्यक्तीने लॉग इन केले होते. त्याच्या गळ्यात ब्लूटूथ इअरफोन दिसत आहेत. तो आपला मोबाईल काही अंतरावर ठेऊन त्याकडे बघताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फ्लशवरून संबंधित व्यक्ती टॉयलेट सीटवर बसलेली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये तो स्वतःला स्वच्छ करतानाही दिसत आहे. यानंतर तो वॉशरूममधून बाहेर पडतो. 




न्यायालयाच्या नोंदीनुसार, संबंधित व्यक्ती एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी म्हणून हजर होता. तो फौजदारी खटल्यात तक्रारदार होता. दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित एफआयआर रद्द केला आहे.

Web Title: VIDEO a man attended the High Court hearing from toilet seat Strange incident in Gujarat video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.