हृदयद्रावक! हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला स्टेजवर मृत्यूने गाठलं अन्...; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 10:58 IST2022-10-03T10:25:45+5:302022-10-03T10:58:26+5:30
देवीचं जागरण सुरू असताना लंकादहनाच्या कार्यक्रमादरम्यान नाचत असताना कलाकार रामस्वरूप अचानक स्टेजवरुन खाली पडले.

हृदयद्रावक! हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला स्टेजवर मृत्यूने गाठलं अन्...; Video व्हायरल
मृत्यू कधी, कुठे, कसा आणि कोणाला गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. देवीच्या जागरण कार्यक्रमात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना धाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर गावात घडली. ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांना मोठा धक्का बसला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, देवीचं जागरण सुरू असताना लंकादहनाच्या कार्यक्रमादरम्यान नाचत असताना कलाकार रामस्वरूप अचानक स्टेजवरुन खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. कलाकाराच्या पत्नीने हे सगळं डोळ्यासमोर पाहिलं अन् तिथेच ती मोठमोठ्याने रडू लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
फतेहपुर के धाता में दुर्गा पूजा पंडाल के एक कार्यक्रम में हनुमान की भूमिका निभा रहे 55 साल के रामस्वरूप की मौत, लंकादहन के दौरान चक्कर खाकर मंच से गिरे और चली गई जान @CMOfficeUP@sengarlive@navalkantpic.twitter.com/iR3WZQAlYo
— rishabh mani (@rishabhmanitrip) October 2, 2022
50 वर्षीय रामस्वरूप साकारत होते हनुमानाची भूमिका
नवरात्रीनिमित्त सलेमपूरमध्ये देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. शनिवारी रात्री रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील 50 वर्षीय रामस्वरूप हनुमानाची भूमिका साकारत होते. लंकेला आग लावण्यासाठी त्यांची शेपटी पेटवली गेली. मात्र, एका मिनिटानंतर त्यांना अचानक झटका आला. यात ते स्टेजवरुन डोक्यावर पडले. लोकांनी त्यांना उचलण्यासाठी धाव घेतली आणि रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
शेकडो लोकांनी पाहिला मृत्यू
हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेली मृताची पत्नी अनुसया आणि शेकडो लोकांनी डोळ्यासमोर या व्यक्तीचा मृत्यू पाहिला. सरपंच गुलाब यांनी सांगितलं की, हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. पोलिसांना न सांगता कुटुंबीयांनी रविवारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, कलाकाराच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"