वनविभागामुळे रखडला विदर्भाचा विकास - जोड

By Admin | Updated: February 16, 2015 02:02 IST2015-02-16T02:02:18+5:302015-02-16T02:02:18+5:30

::::चौकट:::

Vidarbha development due to forest division - Joint | वनविभागामुळे रखडला विदर्भाचा विकास - जोड

वनविभागामुळे रखडला विदर्भाचा विकास - जोड

::::
चौकट:::
विदर्भातील खनिज संपदेतून निर्माण होणारे उद्योग
विदर्भात ५१ लाख दशलक्ष टन कोळसा आहे. त्यावर वीज प्रकल्प व आधारित उद्योग निर्माण होऊ शकतात. चुनखडी १४ लाख दशलक्ष टन आहे, त्यावर सिमेंट कारखाने, लोह १९ लाख दशलक्ष टन आहे, त्यावर पोलाद कारखाना, मॅगनीज २० हजार दशलक्ष टन आहे, फॅरोमॅगनीज, गाडीचे रुळ, बॅटरी सेल उद्योग उभे राहू शकतात. डोलोमाईट ६१ हजार दशलक्ष टन आहे, त्याचा लोह व कोळसा खाणमध्ये भुकटीचा वापर व शोभेचा दगड म्हणून उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर ग्रॅनाईड २ लाख दशलक्ष टन, सिलीको मॅगनीज, कायनाईट सिलीग्नाईट, क्रोमाईट, बेराईट, तांबे, जस्त ही खनिज विदर्भात आहे. तरीही विदर्भ मागास आहे.
::::चौकट::::
विदर्भात वाघासाठी माणसाला मृत्यूच्या दाढेत ढकलले
विदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या नावावर येथील लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे. वाघाच्या भीतीत चंद्रपूर, गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गावे आहेत. वाघांमुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होत असेल, तर ज्यांना वाघ हवे त्यांनी घेऊन जावे. हे व्याघ्रप्रकल्प आमच्या जीवावर उठले असल्याची भावना शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केली.

Web Title: Vidarbha development due to forest division - Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.