हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:33 IST2018-12-11T12:32:54+5:302018-12-11T12:33:27+5:30

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभांच्या मतमोजणीमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलचा आहे.

This is a victory of democracy, Mamata Banerjee's reaction after BJP's defeat | हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया 

हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया 

कोलकाता - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभांच्या मतमोजणीमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलचा आहे. दरम्यान, भारताची दाणादाण उडाल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर भाजपाच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये भाजापाचा होऊ घातलेला पराभव हा लोकशाहीचा विजय असल्याचे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. 

भाजपाच्या पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा लोकशाहीचा विजय आहे. या राज्यांमधील मतदारांनी भाजपाविरोधात मतदान केले आहे. हा देशातील जनतेचा विजय आहे.'' 




''आजचे निकाल हा लोकशाहीचा विजय आहे, सोबतच हा निकाल म्हणजे अन्याय, अत्याचार, लोकशाही संस्थांची गळचेपी, सरकारी संस्थांचा गैरवापर यांच्या विरोधातला विजय आहे.'' असे ममता म्हणाल्या. 



 



 

 

Web Title: This is a victory of democracy, Mamata Banerjee's reaction after BJP's defeat