शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या खड्ड्याने घेतला चिमुकलीचा बळी

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे.

नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे.
नरेंद्रनगरातील जय दुर्गा ले आऊटमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या भागात लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आला असून, त्यात पाणी साचले आहे. इमारत परिसरात राहणारी चिमुकली आकांक्षा खड्ड्यातील पाण्यात पडली. आवाज आल्यामुळे बाजूची मंडळी धावली. तिला पाण्यातून काढून उपचाराकरिता खामल्यातील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ६.४८ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकांक्षाची आई चित्रलेखा रामकैलास नागपुरे (वय २६) यांनी दिलेल्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
धोक्याच्या ठिकाणी सुरक्षा नाही
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणच्या इमारत बांधकामस्थळी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले जातात. अवजड साहित्याची ने आण केली जाते. या धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची, आजूबाजूची निरागस मुले खेळत असतात. बाजूने जाणारे-येणारेही असतात. त्यांना धोका होऊ शकतो, याची जाणीव असूनदेखील तेथे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे या धोक्याच्या ठिकाणी निष्पाप जीवाचा बळी जातो. निरागस आकांक्षाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
---
मानकापुरातील व्यक्तीचा मृत्यू
नागपूर : मानकापुरातील रहिवासी ज्ञानेंद्र शामराव गवळी (वय ५०) हे शनिवारी मध्यरात्री घराजवळ चक्कर येऊन पडले. त्यांना
उपचाराकरीता मेयोत नेले असता उपचारादरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---