शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जगाला भारताची ताकद दिसणार, नरेंद्र मोदी आणि UAE राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये रोड शो करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 22:55 IST

गुजरातीलमधील अहमदाबाद पुन्हा एकदा जगाच्या नजरेसमोर येणार आहे.

नवी दिल्ली : 9 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन करणार आहे. यादरम्यान गुजरातीलमधील अहमदाबाद पुन्हा एकदा जगाच्या नजरेसमोर येणार आहे. या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा रोड शो होणार आहे. अहमदाबाद विमानतळावर नरेंद्र मोदी स्वतः यूएई राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील आणि त्यानंतर विमानतळ ते गांधी आश्रमापर्यंत दोन्ही नेत्यांचा रोड शो होईल.

शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारतातील ही चौथी भेट असणार आहे. विशेष म्हणेज, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे नरेंद्र मोदींना आपला मोठा भाऊ मानतात. दोन्ही नेत्यांच्या कारकिर्दीत भारत आणि यूएईमधील संबंध वेगळ्या पातळीवर आहेत. नरेंद्र मोदींनीही आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत सहा वेळा यूएईला भेट दिली असून ते पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा अबुधाबी येथील मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत.

शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि नरेंद्र मोदी यांच्यातील समजुतीचा फायदा दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्यास झाला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये सुमारे 85 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे आणि यूएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पाच वर्षात पेट्रोलियम उत्पादनांचा व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.

अनेक करार होण्याची शक्यता व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये दोन्ही देशांमध्ये अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र, फूड पार्क आणि आरोग्य क्षेत्राबाबत अनेक करार होण्याची शक्यता आहे. या काळात दोन्ही देशांदरम्यान बिझनेस समिटही होणार आहे. व्यापार आणि गुंतवणुकीव्यतिरिक्त, भारत आणि यूएईमधील मजबूत संबंध भौगोलिक-राजकारणात देखील विशेष भूमिका बजावत आहेत. यूएईच्या माध्यमातून, भारत मध्य पूर्वमध्ये आपली पकड मजबूत करण्यात यशस्वी होत आहे, तर भारत आणि यूएई, इस्रायल आणि अमेरिका सोबत I2U2 कॉरिडॉर स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIndiaभारत