संक्रांतीपूर्वी कोंबड्यांना दिली जातेय व्हायग्रा, शिलाजित; विचारले तर मालक सांगतायत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 02:09 PM2024-01-07T14:09:00+5:302024-01-07T14:09:24+5:30

कोंबड्यांच्या मालकांना एका गंभीर संकटातून जावे लागत आहे. यासाठी य़ा मालकांनी व्हायग्रा आणि शिलाजितचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. 

Viagra, Shilajit given to Fighter Cocks before Sankrant fight andhrapradesh; If asked, the owner says they beacem weak | संक्रांतीपूर्वी कोंबड्यांना दिली जातेय व्हायग्रा, शिलाजित; विचारले तर मालक सांगतायत...

संक्रांतीपूर्वी कोंबड्यांना दिली जातेय व्हायग्रा, शिलाजित; विचारले तर मालक सांगतायत...

संक्रात जसजशी जवळ येऊ लागली आहे तससशी आंध्र प्रदेशच्या गावा गावांमध्ये कोंबड्यांच्या झुंजींची तयारी सुरु झाली आहे. बेकायदा असले तरी गावागावात या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या लढणाऱ्या कोंबड्यांवर लोक मोठ्या प्रमाणावर पैसे लावतात, जिंकतात, हरतात. परंतु, या कोंबड्यांच्या मालकांना एका गंभीर संकटातून जावे लागत आहे. यासाठी य़ा मालकांनी व्हायग्रा आणि शिलाजितचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. 

झुंजणाऱ्या कोंबड्यांची ताकद क्षीण होत चालली आहे. यामुळे त्यांना ताकद देण्यासाठी त्यांचे मालक या कोंबड्यांना सेक्स साठी पावरफुल असलेल्या गोळ्या खाद्यातून देत आहेत. रानीखेत नावाच्या व्हायरल आजाराने या लढणाऱ्या कोंबड्यांना शक्तीहीन व्हावे लागले आहे. यामुळे त्यांचे मालक त्रस्त आहेत. 

संक्रांतीच्या निमित्ताने झुंजीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे या कोंबड्यांना अधिक ताकदवर बनविण्यासाठी व्हायग्रा, शिलाजित आणि व्हिटॅमिन देण्यात येत आहे. याचे साईडइफेक्टही असल्याचे जाणकार सांगत आहेत. संप्रेरक वाढवणारी औषधे केवळ कोंबड्यांनाच हानी पोहोचवत नाहीत तर त्यांचे सेवन करणार्‍या लोकांवरही विपरीत परिणाम करू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. 

मकर संक्रांतीच्या दिवशी आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजीवर करोडो रुपये उधळले जातात. पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमध्ये राजकारण्यांचे समर्थन असलेल्या आयोजकांद्वारे या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घातली होती.

राणीखेत आजारासह कोंबड्यांना श्वसनाच्या तीव्र आजारांनी ग्रासले आहे. चांगल्या दर्जाचे आणि लढाऊ कोंबडे बाजारात मिळत नाहीएत. कोंबड्याच्या लढाऊ जातीला रोगापासून वाचवण्यासाठी खूप पैसा खर्च केला. परंतु, जे आहेत त्यांची ताकद कमी झाली आहे. संक्रांतीसाठी कोंबडी तयार करण्याचा हा शॉर्टकट आहे. त्याचे वजन आणि त्याची गतिशीलता कॉकफाइटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे त्यांना व्हायग्रासारखी उत्तेजक औषधे दिली जात आहेत. सध्या त्यांच्यावर चाचपणी केली जात असून त्याचे रिझल्ट चांगले येत असल्याचे एका मालकाने सांगितले आहे. 

Web Title: Viagra, Shilajit given to Fighter Cocks before Sankrant fight andhrapradesh; If asked, the owner says they beacem weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.