शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 9:13 AM

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र महेश जेठमलानी आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. जेठमलानी आजारी असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या 17 व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले. हाजी मस्तान, हर्षद मेहता असो वा केतन पारेख वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण आणि विधिज्ञ राम जेठमलानी हे गेली सात दशके असणारं समीकरण.  

राम जेठमलानी यांनी ‘या’ व्यक्तींसाठी केलीय वकिली! 

- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांची बाजू न्यायालयात मांडली. 

- दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.

- जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली. 

-  16 वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.

- लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली. 

- सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.

- 2 जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.

- शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.

- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली. 

- चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.

- केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली. 

 

टॅग्स :delhiदिल्ली