Vegetarians, ‘O’ blood type individuals protected from corona, CSIR survey data | शाकाहारी, ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित, सीएसआयआरच्या सिराे सर्वेक्षणातील माहिती

शाकाहारी, ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित, सीएसआयआरच्या सिराे सर्वेक्षणातील माहिती

नवी दिल्ली : धूम्रपान करणारे आणि शाकाहारी व्यक्तींना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष ‘सीएसआयआर’ने केलेल्या सिराे सर्वेक्षणातून काढला आहे. तसेच ‘ओ’ रक्तगट असणाऱ्यांनाही संसर्गाचा धाेका कमी असल्याचे सर्वेक्षणातून आढळले आहे.

सीएसआयआरने संस्थेच्या विविध प्रयाेगशाळांमध्ये काम करणाऱ्या १० हजार ४२७ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने घेतले हाेते. त्यामध्ये १०५८ जणांमध्ये काेराेनाविराेधात लढणारे प्रतिपिंड आढळून आले. गेल्यावर्षी जुलैमध्ये केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने धूम्रपान करणाऱ्यांना काेराेनाचा जास्त धाेका असल्याचा इशारा दिला हाेता. धूम्रपान करणारे तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांनाही काेराेना झाल्यास जास्त गंभीर आजार हाेण्याचा धाेका असल्याचेही सांगण्यात आले हाेते. 

सर्वेक्षणातून उघड -
धूम्रपान करणारे, शाकाहारी, ‘अ’ आणि ‘ओ’ रक्तगट, खासगी वाहनाने प्रवास करणारे तसेच कमी गर्दीच्या ठिकाणी काम करणारे काेराेनापासून जास्त सुरक्षित असल्याचे सर्वेक्षणातून आढळले आहे. त्या तुलनेत सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणारे, सुरक्षारक्षक, स्वच्छतादूत, मांसाहारी आणि धूम्रपान न करणाऱ्यांना काेराेनाचा जास्त धाेका असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vegetarians, ‘O’ blood type individuals protected from corona, CSIR survey data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.