शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

‘भाजीपाला हिंदू झाला, बकरा मुसलमान बनला’, खासदार महुआ मोइत्रांची मोदी सरकारवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:31 IST

No Confidence Motion: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत घणाघाती चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत घणाघाती चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. कुठल्या राज्यामध्ये पाच पोलीस ठाण्यांमधून पाच हजार बंदुका आणि ६ हजार गोळ्या लुटण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीशिवाय कुठल्या राज्याला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

महुआ मोईत्रा पुढे म्हणाल्या की, कुठल्या राज्यामध्ये असं झालंय की, जिथे दोन प्रदेशांच्या मध्ये बफर झोन बनवावा लागलाय. येथील पर्वतीय प्रदेशातील लोक खोऱ्यात जाऊ शकत नाहीत आणि खोऱ्यातील लोक पर्वतीय भागात जाऊ शकत नाहीत. कुठल्या राज्यामध्ये जंगलांचं प्रमाण कमी झालंय. हे सगळं मणिपूरमध्ये घडलं. हे या डबल इंजिनच्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे. 

समाजात पसरत असलेल्या द्वेषावरूनही महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आता भाजीपाला हिंदू झालाय आणि बकरा मुसलमान झालाय. अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आलंय. एक समाज दुसऱ्या समाजाविरोधात गुन्हे करत आहे आणि पीडितांना न्याय मिळत नाही आहे.

मोदी सरकारवरील हल्ल्याची धार वाढवताना अविश्वास प्रस्तावाबाबत महुआ मोईत्रा म्हणाल्या की, आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे आकडे नाही आहेत. बीजेडीसह काही पक्षांनी आमची साथ सोडली आहे. मात्र आम्ही I.N.D.I.A बनून इथे सरकार पाडण्यासाठी आलेलो नाही आहोत. तर आम्ही इथे काही तरी नवनिर्माण करण्यासाठी आलो आहोत. हा अविश्वास प्रस्ताव काही पाडण्यासाठी नाही, तर काही तरी समोर आणण्यासाठी आणला गेलाय. हा अविश्वास प्रस्ताव I.N.D.I.A बाबत विश्वास निर्माण व्हावा म्हणून आणण्यात आला आहे.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदी