Petrol, Diesel Price Cut: काँग्रेसशासित राजस्थानमध्ये देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी झाला; महाराष्ट्रात कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 08:22 AM2021-11-17T08:22:19+5:302021-11-17T08:42:11+5:30

Petrol, Diesel Price Cut in Rajasthan: भाजपाची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रात, पंजाबमधील सरकारे व्हॅट कमी करणार नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रानेच आणखी कर कमी करावेत अशी मागणी केली जात आहे.

VAT on petrol and diesel reduced in Congress-ruled Rajasthan; When in Maharashtra? | Petrol, Diesel Price Cut: काँग्रेसशासित राजस्थानमध्ये देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी झाला; महाराष्ट्रात कधी?

Petrol, Diesel Price Cut: काँग्रेसशासित राजस्थानमध्ये देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी झाला; महाराष्ट्रात कधी?

googlenewsNext

दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करामध्ये कपात करत वाढलेले दर काही प्रमाणात कमी केले होते. तसेच राज्य सरकारांनाही व्हॅटमध्ये 7 रुपयाची कपात करण्याचे आवाहन केले होते. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांनी त्याच रात्री किंवा दोन दिवसांत व्हॅट कमी करत जनतेला दिलासा दिला होता. परंतू महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी व्हॅट कमी करण्यास नकार दिला होता. देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक दर होते. 

आता राजस्थानातील गेहलोत सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर 4 रुपये आणि डिझेलवर 5 रुपयांनी व्हॅट कमी केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही बैठक झाली. यानंतर गेहलोत यांनी ट्विट करून याची माहिती दिली, तसेच यामुळे सरकारला 3500 कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे म्हटले आहे. 

असे असले तरी भाजपाची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रात, बिगर भाजपा सरकारे व्हॅट कमी करणार नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रानेच आणखी कर कमी करावेत अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारचा जीएसटी वाटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरात देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी होणार नसल्याचे म्हटले होते. भाजपशासित राज्यांत इंधनाचे दर कमी झाल्याने महाराष्ट्राचे शेजारी गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर खूप कमी आहेत. कर्नाटकमध्ये तर महाराष्ट्रापेक्षा कमी दर, असे बोर्ड लागले आहेत. 

Web Title: VAT on petrol and diesel reduced in Congress-ruled Rajasthan; When in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.