शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधराराजेंच्या भवितव्याचा आज फैसला; १५९ नावांचा होईल निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 06:18 IST

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थान भाजपमधील तिकीट वाटपातील सस्पेन्स कायम असून, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. रविवारी सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, २०० पैकी उर्वरित १५९ विधानसभा मतदारसंघांतील तिकिटे निश्चित केली जाणार आहेत. पक्षाने ४१ जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. यात लोकसभेचे सहा खासदार आणि एका राज्यसभा सदस्याचा समावेश आहे. 

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने कोणताही धोका पत्करावा लागू नये म्हणून वरिष्ठांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

२०० जागांची चार श्रेणींमध्ये विभागणी पक्षाच्या एका सरचिटणीसांनी सांगितले की, २०० जागा चार श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत. अ श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्षाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर ब श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे भाजपचा विजय आणि पराभवाचा संमिश्र इतिहास आहे. सी श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्ष तुलनेने कमकुवत असल्याचे मानले जाते. या उलट श्रेणी डच्या जागांवर गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचा सतत पराभव झाला आहे. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय गुणवत्तेवरच घेतला जाईल.

पितृपक्ष संपताच वाढणार हालचाली अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा संपताच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगढ आणि मिझोराममध्ये या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना उद्यापासून वेग येणार आहे. या निवडणुकांमधील मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप आपापल्या उमेदवारांची नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे, तर तेलंगणमध्ये सत्ताधारी भारत राष्ट्रसमिती उद्या निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करणार आहे.काँग्रेसने २०१८ साली छत्तीसगढ विधानसभेत ९० पैकी ६८ जागा जिंकून पंधरा वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार यंदा छत्तीसगढ काँग्रेसच्या १५ ते २० विद्यमान आमदारांवर  टांगती तलवार आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणच्या उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी पूर्ण झाल्या असून, नावांची घोषणा उद्यापासून होण्याची शक्यता आहे. 

२२ खोक्यात ४२ कोटी; बीआरएसकडून आरोपबंगळुरू : येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्वत्थम्मा, त्यांचे पती आर. अंबिकापती, मुलगी यांच्या घरातून ४२ कोटी रुपयांची रोकड आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील ही रक्कम भरलेले २२ खोके त्या घरातील पलंगाखाली दडवून ठेवले होते. हा काँग्रेसचा पैसा असून तो तेलंगणातील निवडणुकांसाठी हैदराबाद येथे नेणार होते, असा आरोप बीआरएस नेते हरीश राव यांनी केला.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपा