वरखेड वाघजाळीचा बंधारा गाळाने भरला गाळ काढण्यात यावा : शेतकर्यांची मागणी
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:08+5:302014-12-20T22:28:08+5:30
चिखलगाव : नजीकच्या वरखेड वाघजाळी येथे मोर्णा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यातून शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु, हा बंधारा सध्या गाळाने भरला असल्यामुळे सिंचनास पाणी मिळत नाही. त्यामुळे या बंधार्यातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वरखेड वाघजाळीचा बंधारा गाळाने भरला गाळ काढण्यात यावा : शेतकर्यांची मागणी
च खलगाव : नजीकच्या वरखेड वाघजाळी येथे मोर्णा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यातून शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु, हा बंधारा सध्या गाळाने भरला असल्यामुळे सिंचनास पाणी मिळत नाही. त्यामुळे या बंधार्यातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वरखेड वाघजाळी येथे मोर्णा नदीवर बांधलेल्या बंधार्यातील पाणी शेतकर्यांच्या शेतीला ओलितासाठी देण्याकरिता राजंदा-सिंदखेड मार्गे कालवा काढण्यात आला. परंतु, आता हा बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात यावरून होणारे सिंचनाचे क्षेत्र घटले आहे. सध्या या बंधार्यातून नदीत सोडण्यात येणार्या पाण्याद्वारे १०० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत आहे. या बंधार्यातील गाळ काढल्यास त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाच्यावतीने या बंधार्यातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)फोटो क्रमांक २१ सीटीसीएल ००००००००००००००००००