नवयोगेश्वर कल्याण खालशासह विविध खालशांचे ध्वजारोहण

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

नाशिक : साधुग्राममधील विविध खालशांचे ध्वजारोहण एकापाठोपाठ होत असून, धार्मिक कार्यक्रमांनादेखील प्रारंभ होत आहे. दिगंबर अनी आखाड्याअंतर्गत असलेल्या नवयोगेश्वर खालशाचे ध्वजारोहण महंत बालकृष्णदास महात्यागी यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर कल्याण खालसा, बाराहघाट खालसा, बाराभाई दांडिया, तेराहभाई त्यागी आदि खालशांचे ध्वजारोहण झाले.

Various Khalsh flag hoisting with Navyogeshwar Kalyan Khalsa | नवयोगेश्वर कल्याण खालशासह विविध खालशांचे ध्वजारोहण

नवयोगेश्वर कल्याण खालशासह विविध खालशांचे ध्वजारोहण

शिक : साधुग्राममधील विविध खालशांचे ध्वजारोहण एकापाठोपाठ होत असून, धार्मिक कार्यक्रमांनादेखील प्रारंभ होत आहे. दिगंबर अनी आखाड्याअंतर्गत असलेल्या नवयोगेश्वर खालशाचे ध्वजारोहण महंत बालकृष्णदास महात्यागी यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर कल्याण खालसा, बाराहघाट खालसा, बाराभाई दांडिया, तेराहभाई त्यागी आदि खालशांचे ध्वजारोहण झाले.
अयोध्या येथील महंत बालकृष्णदास महात्यागी यांचा तपोवनातील स्वामीनारायण स्कूल ते तपोवन नर्सरी रोडवरील नवयोगेश्वर खालशाचे ध्वजारोहण महंत बालकृष्णदास महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महंत रामकृष्णदास (उज्जैन), महंत काशीदास (मुंबई), महंत शंकरदास (नवी मुंबई) आदि उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर पंडित केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तकुंड यज्ञाला प्रारंभ झाला. तसेच संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संपतराव धात्रक, लक्ष्मणराव धोत्रे, अण्णा पानवाले, किशनसिंग आदिंसह पंचवटीतील भाविकांनी सहकार्य केले.
औरंगाबाद रोडवरील सरस्वती लॉन्स, सुखमनी लॉन्सच्या पुढे कल्याण खालसा महामंडलेश्वर बाबा गोपालदास व महामंडलेश्वर चंद्रदेवदास यांच्या खालशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या हस्ते झाले. यावेळी महंत राजेंद्रदास, महंत धरमदास, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत माधवचार्य, महंत भक्तिचरणदास आदिंसह संत-महंत उपस्थित होते.
दरम्यान, साधुग्राममधील चतु:संप्रदाय आखाडा ध्वजारोहणानंतर तेराभाई त्यागी खालशात महंत ब्रिजमोहनदास, बाराभाई दांडिया खालशात राधेराधेबाबा यांच्या हस्ते, बालाघाटच्या नंदराम खालशात महंत रामप्रवेशदास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी खालसा परिषदेचे महामंत्री हरिओमदास, शंकरदास, महामंडलेश्वर चंद्रदेवदास आदि उपस्थित होते.

Web Title: Various Khalsh flag hoisting with Navyogeshwar Kalyan Khalsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.