भीषण! काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:16 AM2023-10-04T10:16:58+5:302023-10-04T10:24:05+5:30

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला.

varanasi road accident 8 people killed of same family from pilibhit collision between car truck | भीषण! काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू

फोटो - आजतक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. लहान मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फुलपूर पोलीस ठाण्याच्या करखियाव येथे भरधाव वेगात असलेल्या एर्टिगा कारची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेले. तसेच भीषण अपघाताविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांचा मुलगा वगळता कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. 

मृत्यू झालेले सर्वजण पीलीभीत येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर बनारसहून जौनपूरला जात असताना फुलपूर पोलीस ठाण्याच्या करखियावजवळ हा अपघात झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात व्यस्त आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. आत्म्याला शांती लाभो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल परिवाराप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: varanasi road accident 8 people killed of same family from pilibhit collision between car truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.