शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 12:08 IST

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या कुटुंबापासून दूर राहून, जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करत आहेत.

वाराणसी - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18655 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. देशात काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या कुटुंबापासून दूर राहून, जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र मास्क लावायला सांगितल्यामुळे पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मास्क न लावल्यामुळे टोकलं म्हणून भाजपाच्या  एका नेत्याने पोलिसांना मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मास्क न लावण्यावरून वाद झाला आणि पुढे नेत्याने आणि काही लोकांनी पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्क न घालता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी रोखलं. त्याने फोन करून भाजपाच्या काही मंडळींना बोलावलं. भाजप जिल्हा पंचायत सदस्य सुरेंद्र पटेल आणि त्यांचा भाऊ बिंदू पटेल यांच्यासह इतर काही लोक आली. त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाजपा नेत्यासह अनेकांवर कारवाई केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये ही अशीच एक घटना घडली होती. सरकारी कार्यालयात एक कर्मचारी मास्क घालून आला नाही म्हणून त्याच्यासोबतच काम करणाऱ्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्याने त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यावरून दोघांमध्ये थोडा वाद झाला. संतापाच्या भरात कर्मचाऱ्याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेला वाचवण्यासाठी इतरही काही  कर्मचारी आले मात्र त्या व्यक्तीने बेदम मारहाण सुरूच ठेवली.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा

CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी

देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसBJPभाजपा