शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वनताराला मोठा दिलासा, त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिट, दिले असे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:30 IST

Vantara News:  सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील जामनगर येथील वनतारा झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅब्लिटेशन सेंटरला एसआयटीच्या चौकशीनंतर क्लीन चिट दिली आहे. एसआयटीने दिलेल्या अहवालाचं अध्ययन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, वनतारा पूर्णपणे कायद्याचं पालन करत आहे.

 सर्वोच्च न्यायालयानेगुजरातमधील जामनगर येथील वनतारा झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅब्लिटेशन सेंटरला एसआयटीच्या चौकशीनंतर क्लीन चिट दिली आहे. एसआयटीने दिलेल्या अहवालाचं अध्ययन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, वनतारा पूर्णपणे कायद्याचं पालन करत आहे. त्याला बदनाम करण्यात येऊ नये. न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि न्यायमूर्ती पी. बी. वराले यांच्या खंडपीठाने यांच्या खंडपीठाने शुक्रवारी कोर्टात सादर करण्यात आलेला अहवाल रेकॉर्डवर घेतला आणि सोमवारी त्याचं परीक्षण केलं.

यावेळी कोर्टाने सांगितले की, न्यायालय या अहवालाच्या सखोल विश्लेषणानंतर एक सविस्तर आदेश प्रसिद्ध करेल. दरम्यान, वनतारामध्ये असलेल्या सुविधा आणि उपयायोजनांबाबत प्राधिकरणांनी समाधान व्यक्त केल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे. वनतारामधील कधीत असुविधांबाबत चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी एक चार सदस्यीय एसआयटीची स्थापना केली होती. त्याचं अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयातील एक माजी न्यामूर्ती भूषवत होते. हा तपास दोन जनहित याचिकांच्या आधारावर सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये वनतारावर भारत आणि पदरेशातून हत्तीच्या खरेदीमध्ये कायद्यांच उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या याचिकांमध्ये प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि विविध एनजीओ आणि वन्यप्राणी संघटनांच्या तक्रारींचा हवाला देण्यात आला होता. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते सी. आर. जया सुकिन यांची याचिका पूर्णपणे अस्पष्ट असल्याचे म्हटले होते. वनतारामध्ये बंद असलेल्या हत्तींना त्यांच्या मूळ मालकांकडे सोपवण्यासाठी एक मॉनिटरिंग समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी सुकिन यांनी केली होती. तसेच  मंदिरामधील हत्तींना एकेक करून वनतारामध्ये नेलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र आता एसआयटीच्या अहवालामध्ये वनताराचं संचालन हे पारदर्शक आणि कायद्यानुसार होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयVantaraवनताराwildlifeवन्यजीवGujaratगुजरात