Vande Mataram Lok Sabha Debate: 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज यावर विशेष चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणातून या चर्चेला सुरुवात केली. यादरम्यान ते म्हणाले की, 'देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे. जगाच्या इतिहासात अशी कविता किंवा असे कोणतेही भावनिक गाणे असू शकत नाही, ज्याने शतकानुशतके लाखो लोकांना एकाच ध्येयासाठी प्रेरित केले.'
वंदे मातरमने स्वाभिमान, स्वावलंबन जागृत केले
मोदी पुढे म्हणाले, 'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वीर सावरकरांनी ‘वंदे मातरम्’ गायले. या नावाने वृत्तपत्रे काढली गेली, ज्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. भीकाजी कामांनी पॅरिसमध्ये ‘वंदे मातरम्’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या गीताने देशात स्वावलंबनाची भावना रुजवली. लहान मुलेही प्रभातफेरी काढत ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत. त्यांना तुरुंगात डांबले जायचे, चाबकाचे फटके मारले जायचे. बंगालच्या गल्लींमधून उठलेली ही आवाज अखेर संपूर्ण देशाचा आवाज बनली."
वंदे मातरमवर अन्याय झाला
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'वंदे मातरमसोबत विश्वासघात का झाला? त्यावर अन्याय का झाला? कोणत्या शक्तीने वंदे मातरम सारख्या पवित्र गीताला वादांच्या भोवऱ्यात ढकलले? नवीन पिढीला हा इतिहास सांगितलाच पाहिजे. काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा हा त्यांचा मार्ग होता. त्यामुळेच काँग्रेसला भारताच्या फाळणीलाही बळी पडावे लागले. काँग्रेस ज्यांच्याशी संबंधित आहे, ते वंदे मातरमवरून तीव्र वाद निर्माण करतात. इतिहास साक्षी आहे की, काँग्रेस मुस्लिम लीगला शरण गेली.'
जिनांनी वंदे मातरमचा विरोध केला
'15 ऑक्टोबर 1936 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिनांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे सिंहासन धोक्यात असल्याचे दिसले. त्यामुळे मुस्लिम लीगच्या निराधार विधानांचा तीव्र निषेध करण्याऐवजी, नेहरुंनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली. नेहरू म्हणाले होते की, वंदे मातरमची पार्श्वभूमी मी वाचली आहे आणि त्यामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ होऊ शकतो. त्यानंतर काँग्रेसने जाहीर केले की, 26 ऑक्टोबरला कोलकाता येथील बैठकीत वंदे मातरमच्या वापराचा आढावा घेतला जाईल,' अशी टीकाही पीएम मोदींनी केली.
Web Summary : PM Modi slams Congress for allegedly appeasing Muslim League over Vande Mataram. He accuses them of dividing the nation and prioritizing political gains over national sentiment, leading to partition.
Web Summary : पीएम मोदी ने वंदे मातरम पर मुस्लिम लीग को खुश करने का आरोप लगाते हुए कांग्रेस पर हमला बोला। उन्होंने उन पर राष्ट्र को विभाजित करने और राजनीतिक लाभ को प्राथमिकता देने का आरोप लगाया, जिसके कारण विभाजन हुआ।