शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 05:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

मुंबई : पूर्वी खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालायात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटं, पाच मिनिटं थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करतात. पूर्वीचा आणि आत्ताचा हा महत्त्वाचा फरक आहे. वंदे भारत ट्रेन भारताची प्रगती आणि वेग या दोन्हींचे प्रतिबिंब आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल व रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रामदास आठवले, विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

वाहतूककोंडीला गुड बाय सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्गाच्या एका मार्गिकेचे आणि बीकेसी ते लालबहादूर शास्त्री उड्डाणपुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन करून हे मार्ग वाहतुकीसाठी खुले केले. यामुळे बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी होणार असून, वाहनचालकांची २५ मिनिटांहून अधिक वेळेची बचत होईल.

बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासूनचे नाते!मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथे मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून मी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बोहरा समाजाला साद घातली. अल्जामिया-तुस-सैफियाह शिक्षण संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. संस्थेचे कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन यांच्याकडून पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला.     

महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्राला १३,५०० कोटी पहिल्यांदाच रेल्वेसाठी मिळाले आहेत. हे सामान्य लोकांचे सरकार आहे, फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. पंतप्रधानांचे पाच ट्रिलियन डॉलर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न असून त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल.      - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

भाविक आणि प्रवाशांसाठी दोन्ही वंदे भारत गाड्या मैलाचा दगड ठरतील. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच महाराष्ट्राला भरघोस निधी मंजूर झाला आहे. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या भारतीय रुळांवरून धावतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे.     - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईSolapurसोलापूरshirdiशिर्डीBJPभाजपा