Tata-Mistry Case: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट वादात सर्वोच्च न्यायालयाकडूनटाटा सन्सला मोठा दिलासा मिळाला. सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. NCLT नं २०१९ मध्ये आपल्या निर्णयात मिस्री यांना पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द केला. यानंतर रतन टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.हा जय किंवा पराभवाचा मुद्दा नसल्याचं म्हणत रतन टाटा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो. हा केवल जय पराजयाचा मुद्दा नव्हता. माझ्या अखंडतेवर आणि समुहाच्या नैतिक आचरणावर सतत कठोर हल्ले झाल्यानंतर टाटा सन्सच्या मागमअयांना मान्यता देणारा हा निकाल या समुहाचे नेहमीच मार्गदर्शक राहिलेली मूल्ये आणि नैतिकता यांचं प्रामाणिकरण आहे," अशी प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
Tata-Mistry Case: "हा केवळ जय-पराजयाचा मुद्दा नाही," सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 18:10 IST
Tata-Mistry Case: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट वादात सर्वोच्च न्यायालयाकडून टाटा सन्सला मोठा दिलासा
Tata-Mistry Case: हा केवळ जय-पराजयाचा मुद्दा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया
ठळक मुद्देदेशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट वादात सर्वोच्च न्यायालयाकडून टाटा सन्सला मोठा दिलासा२०१६ मध्ये सायरस मिस्त्रींची करण्यात आली होती हकालपट्टी