शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वाजपेयी आणि मोदीसुद्धा पाकिस्तानला जाऊन आलेत, मग माझं काय चुकलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 2:40 PM

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धूच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही.

नवी दिल्ली  - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धूच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. दरम्यान, सिद्धु यांनी इम्रान खानच्या शपथविधीला लावलेली उपस्थिती आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या घेतलेल्या गळाभेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझा पाकिस्तान दौरा राजकीय नव्हता. मी जे केले आहे ते वाजपेयी आणि मोदींनी आधीच केले आहे. "कारगिल युद्धानंतर वाजपेयी यांनी परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली होती. तर नरेंद्र मोदींनी कोणतेही आमंत्रण नसताना नवाझ शरीफ यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती." असे सिद्धू म्हणाले.

तसेच बाजवा यांच्याशी घेतलेल्या गळाभेटीबाबतही सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली. "इम्रान खान यांच्या शपथविधीदरम्यान मी बाजवा यांना भेटलो. त्यावेळी खूप उत्साहाने ते मला भेटले, गळाभेट घेतली. तसेच गुरुनानक यांच्या 500 व्या प्रकाश वर्ष दिवशी भारतातील डेरा बाबा नामक येथून  पाकिस्तानमध्ये अडीच किमी अंतरावर करतारपूर साहब येथे भाविकांना थेट प्रवेश दिला जावा यासाठी प्रयत्न करून.  आम्हालाही शांतता हवी आहे. एकंदरीत बाजवा यांचे बोलणे मला भावनात्मक वाटले."असे सिद्धू म्हणाले. 

यावेळी इम्रान खान यांच्या नव्या सरकारकडून सिद्धू यांनी अपेक्षाही व्यक्त केल्या. ते म्हणाले, "फाळणीनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधरू शकले नाहीत. हे दोन्ही देशांचे दुर्दैव आहे. दोन्हीकडे कटुता कायम आहे. असा कडवटपणा दोन्हीकडच्या करोडो लोकांसाठी शाप आहे. आज त्या देशात ज्याप्रकारे दहशतवाद्यांचे संघठन झाले आहे ते पाहता पाकिस्तानचे भविष्य संकटात असल्याचे वाटते. त्यामुळे अशा परिस्थितीत एक दृढनिश्चयी नेता आणि त्याचे सरकारच काही तरी करू शकेल. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारतPakistanपाकिस्तान