The vaccine was injected by Adar Poonawala of 'Siram'; The message given to the country that 'Covishield' is safe | 'सिरम'च्या अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस; 'कोविशिल्ड' सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश

'सिरम'च्या अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस; 'कोविशिल्ड' सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश

पुणे : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या'सिरम' इन्स्टिट्यूट निर्मित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून लसीकरण सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

गेल्या काही महिन्यांपासून अविरत मेहनत व संशोधन करून 'कोविशिल्ड' या लसीद्वारे जगाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखविलेल्या 'सिरम' इन्स्टिटयूटच्या आज सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेद्वारे ध्येयपूर्ती झाली आहे. याचवेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेतली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ सादर करत दिली आहे.
 
गेले अकरा महिने कोरोनाच्या साथीचा सर्वांनीच नेटाने सामना केला. कोरोनावरील लस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीने विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन झाले. तीन टप्प्यामध्ये मानवी चाचण्या पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर पुनावाला यांनीही स्वतः लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.

लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे, अशा आशयाचे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.

'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले होते. त्यामुळे कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारतासह जगाला या लसीबाबत प्रचंड उत्सुकता होती.

आदर पूनावाला यांनी साधारण जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान कोरोना लस उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती. केंद्र सरकारने लास वापराबाबत हिरबवा कंदील दाखविल्यानंतर या लसीची भारतासह जगाला उत्सुकता होती. १२ जानेवारीला देशभरात कोविशील्ड लस रवाना करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना लसीकरणाची सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. तसेच लसीकरणादरम्यानची सर्वतोपरी काळजी देखील रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The vaccine was injected by Adar Poonawala of 'Siram'; The message given to the country that 'Covishield' is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.