Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:04 IST2025-08-05T19:04:03+5:302025-08-05T19:04:57+5:30
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे.

Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ढगफुटीमुळे धराली या उंचावरील गावांमध्ये अचानक पूर आला. आतापर्यंत या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. याच दरम्यान दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ढिगाऱ्यातूनही दोन जणांचा जीव वाचला आहे.
व्हिडीओमध्ये ढिगाऱ्यातून दोन जण कसे वाचले हे पाहायला मिळत आहे. काही लोक त्यांना लवकर पळून जा आणि जीव वाचवा असं म्हणत आहेत. "पळ भावा पळ..." असं म्हणत आहेत. रिपोर्टनुसार, ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला, ज्यामुळे गावातील घरांसह सर्वकाही वाहून गेलं आणि प्रचंड विनाश झाला. लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे जे वाचले ते खरोखर भाग्यवान आहेत. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
उत्तरकाशी में आए भयावह सैलाब के बाद पानी मिट्टी के मलबे से जिंदा निकल कर एक व्यक्ति बाहर आ जाता है। मौत से जिंदगी के संघर्ष का जीता जागता उदाहरण।#uttarkashicloudburstpic.twitter.com/cCLi9mI7r8
— Kushagra Upadhyay (@KushagraUp7958) August 5, 2025
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि दुर्गम भागात मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत
हृदय विदारक। लोग भागने का प्रयास कर रहे थे सफल नहीं हुए।pic.twitter.com/m1fnOU592C
— प्रधान 2.0 (@Panchpradhan_) August 5, 2025
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही."