uttarakhand flood: मृत्यूच्या दाढेतून बचावले तिघे, पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 22:14 IST2018-07-30T22:14:07+5:302018-07-30T22:14:31+5:30

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

uttarakhand flood: Three survivors from death, see thrilling video | uttarakhand flood: मृत्यूच्या दाढेतून बचावले तिघे, पाहा थरारक व्हिडीओ

uttarakhand flood: मृत्यूच्या दाढेतून बचावले तिघे, पाहा थरारक व्हिडीओ

डेहराडून- उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हल्दवानी परिसरात पुराच्या पाण्यात तीन गाड्या अडकल्या होत्या. त्यात दोन कार आणि एका रिक्षाचा समावेश आहे. या कारमधले तिघे जण मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत. नाल्याच्या अलीकडे आलेल्या पुरामुळे तिन्ही गाड्या अडकून पडल्या होत्या. प्रवाशांनी गाडीमधून बाहेर येत गाडीच्या टपावरून उड्या मारत स्वतःचे जीव बचावले आहेत. प्रवासी बाहेर आल्यानंतर या तीन गाड्यांमधील एक गाडी पुराच्या पाण्याबरोबर नाल्यात वाहून गेली आहे. गाडी वाहून जातानाचा हा थरारक व्हिडीओ एएनआयनं शेअर केला आहे.



   

Web Title: uttarakhand flood: Three survivors from death, see thrilling video

टॅग्स :floodपूर