शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Uttarakhand Election: बिपीन रावत यांचे धाकटे बंधू भाजपात, मुख्यमंत्र्यांना भेटून केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 8:28 PM

Uttarakhand Election: उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचा तगादा सुरू झाला आहे.

Uttarakhand Election: उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचा तगादा सुरू झाला आहे. यातच देशाचे दिवंगत सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचे धाकटे बंधू कर्नल विजय रावत (Col Vijay Rawat) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. आज सकाळीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी दिल्लीत कर्नल विजय रावत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर विजय रावत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असून दिल्लीत विजय रावत यांनी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. 

उत्तराखंड विधानसभेसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कर्नल रावत यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आणि कुटुंबीयांची विचारधारा भाजपाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश करुन जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पक्षानं परवानगी दिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यास तयार असल्याचंही विजय रावत म्हणाले. 

बिपीन रावत यांना पर्वतरागांमधील नागरिकांचं दु:खं समजायचंदिवंगत सीडीएस बिपीन रावत हे उत्तराखंडमध्ये खूप सक्रिय होते. दोन वर्षांपूर्वी बिपीन रावत यांनी केदरानाथ आणि गंगोत्री धामचे दर्शन घेतल्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या पत्नीसह मूळ गावी म्हणजेच उत्तरकाशीतील डुंडा ब्लॉकस्थित ननिहाल धाती येथे पोहोचले होते. गावाला भेट दिल्यानंतर बिपीन रावत यांनी गावकऱ्यांची मोठ्या आत्मियतेनं विचारपूस केली होती. देशाचा लष्करप्रमुख आपल्या गावचा रहिवासी आहे आणि आज तो आपल्याशी बोलत आहे याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान वाटत होता. 

जेव्हा गावातील नागरिकांच्या समस्या बिपीन रावत यांनी जाणून घेतल्या होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गावकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं अशा भावना दिसून आल्या होत्या, असं विजय रावत म्हणाले. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२Bipin Rawatबिपीन रावत