उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:41 IST2025-09-20T19:40:46+5:302025-09-20T19:41:26+5:30
यावेळी त्यांनी मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेतला. तसेच, पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकराच्या मदतीचे आश्वासन दिले. आता येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे.

उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
चमोली जिल्ह्यातील नंदानगर भागात ढगफुटी होऊन नुकत्याच आलेल्या आपत्तीनंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः शनिवारी (20 सप्टेंबर 2025) आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेतला. तसेच, पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकराच्या मदतीचे आश्वासन दिले. आता येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे.
यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी मदत आणि बचाव कार्यांची माहिती घेतली. तसेच पीडितांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, त्यांनी प्रभावित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचीही चौकशीकेली आणि सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला. तसेच, या आपत्तीच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. सर्व आवश्यक संसाधने प्राधान्याने उपलब्ध करून दिली जात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मदत छावण्यांचे निरीक्षण करताना मुख्यमंत्र्यांनी अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि तात्पुरत्या निवासस्थानांच्या सुविधांचाही आढावा घेतला. याच बरोबर, जनजीवन लवकरात लवकर सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यात आपत्तींना सामोरे जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम आणि लोकप्रतिनिधीही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.