शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बाबू काळजी घे, औषध वेळेवर घे! फेसबुक लाईव्ह करून प्रियकराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:58 IST

उत्तर प्रदेशात बिहारमध्ये आलेल्या तरुणाची गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात आत्महत्या

पाटणा: वर्षानुवर्षे प्रेमसंबंध नसताना अचानक एका व्यक्तीनं माघार घेतल्यास, प्रेमसंबंध तोडल्यास दुसऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो. अनेकदा अशा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलतात. बिहारची राजधानी पाटण्यात असाच एक प्रकार घडला आहे. गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रेमभंग झालेल्या तरुणानं फेसबुक लाईव्ह करून त्याचं आयुष्य संपवलं. स्वत:ची काळजी घे, वेळेवर औषध घे, असं म्हणत प्रियकरानं त्याची जीवनयात्रा संपवली.

बाललीला गुरुद्वाऱ्यातील एनआरआय अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०७ मध्ये तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणारा तरुण मूळचा उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचं नाव परमजीत सिंग असं आहे. प्रेम प्रकरणातून परमजीतनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू आहे.पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला

परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. परमजीत अनेक दिवसांपासून अतिथीगृहात वास्तव्यास होता. तो दिल्लीतल्या गुरुद्वाऱ्यात ग्रंथी होता. तिथे तो प्रवचन द्यायचा. तो दिवसभर सिमरनची भेट घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिनं भेटण्यास नकार दिला. त्यानंतर परमजीतनं आत्महत्या केली.जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...

फेसबुक लाईव्हमध्ये परमजीतनं त्याची प्रेयसी सिमरनसोबत बोलण्यासाठी, भेटण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. 'सिमरना शेकडो कॉल केले. पण तिनं उत्तर दिलं नाही. तिला भेटण्यासाठी खूपदा प्रयत्न केले. ती पाटणा साहेब गुरुद्वाऱ्यात आली असल्याचं समजलं म्हणून इथे आलो. ती आज गुरुद्वाऱ्यात आली. पण तिनं मला साधं वळूनही पाहिलं नाही. तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं म्हणून ती निघून गेली,' अशा शब्दांत परमजीतनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

'तू खूष राहा. स्वत:चा संसार थाट. तू चांगलं शिक्षण घेते आहेस. त्यामुळे तुझ्याकडे सगळं असेल. शेवटी इतकंच सांगेन, मित्रांनो प्रेमाच्या भानगडीत पडू नका. तुमच्या आयुष्यावर लक्ष द्या. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आजही करतो आणि मरणानंतरही करेन. माझ्या सिमरनला कोणी काहीही बोलणार नाही. बाबू स्वत:ची काळजी घे. औषधं वेळेवर घे,' असं म्हणत परमजीतनं जीवन संपवलं.