शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दलित महिला आमदाराचा मंदिर प्रवेश, स्थानिकांनी गंगाजलाने मूर्तीला घातलं स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 13:22 IST

अजूनही आपल्या देशाची जाती-धर्माच्या जोखडातून सुटका झाली नसल्याचेच चित्र काही उदाहरणांमधून वारंवार समोर येत आहे. असाच काहीसा चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे.

नवी दिल्ली - अजूनही आपल्या देशाची जाती-धर्माच्या जोखडातून सुटका झाली नसल्याचेच चित्र काही उदाहरणांमधून वारंवार समोर येत आहे. असाच काहीसा चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये जाती-पातीवरुन एक लाजीरवाणी घटना घडली आहे. केवळ एका दलित महिला आमदारानं देवदर्शन केले म्हणून येथील मंदिर गंगाजलाने धुण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भाजपाच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी धूम ऋषि आश्रम मंदिरात पूजा-अर्चना केली. मात्र अनुरागी मंदिरातून बाहेर पडताच मंदिर गंगाजलानं धुण्यात आले. मनिषा अनुरागी केवळ दलित आहेत, म्हणून मंदिर गंगाजलनं धुण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

12 जुलैला आमदार मनिषा हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा खुर्द गावात एका शालेय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. सभारंभ पार पडल्यानंतर त्या शाळेतून धूम ऋषि मंदिर दर्शनासाठी निघाल्या. आमदार मनिषा अनुरागी यांनी मंदिर दर्शन केल्याची माहिती येथील स्थानिकांना समजताच, मंदिर अपवित्र झाल्याची ओरड करत त्यांनी मंदिर आणि मंदिरातील मूर्ती गंगाजलानं धुतली. 

स्थानिकांनी वर्गणी गोळा करत धूम्र ऋषिची मूर्ती अलाहाबादमध्ये आणली आणि तेथे मूर्तीला गंगाजलानं आंघोळ घातली. यानंतर मंदिरात मूर्तीची स्थापना केली. मंदिरातील एका पुजारीनं सांगितले की, ‘आतापर्यंत या मंदिरात कोणत्याही महिलेनं प्रवेश केला नव्हता. ज्यावेळेस मनिषा यांनी मंदिरप्रवेश केला त्यावेळेस मी तेथे हजर नव्हतो. मी मंदिरात असतो तर त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नसता. येथे महिलांना मंदिर प्रवेश करण्यास परवानगी नाहीय''

दरम्यान, मनिषा अनुरागी उत्तर प्रदेशातील राठ मतदारसंघातील आमदार आहेत. मंदिर प्रवेश करुन काहीही अयोग्य असे वर्तन केलेले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा यांनी दिली आहे. 'मंदिरात महिलांना प्रवेश नाही, याबाबतची माहिती नव्हती. तसेच मंदिरात प्रवेश करुन मी काहीही चूक केलेले नाही', असं म्हणत मनिषा यांनी आपल्या मतावर ठाम असल्याचं सांगितलं.  

टॅग्स :TempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा