शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणारा पोलिसांच्या ताब्यात; ATM कार्ड बदलून करायचा फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 19:11 IST

बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणाऱ्या नटवरलाल बजरंग बहादूरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली : बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नटवरलाल बजरंग बहादूर उर्फ ​​सावन सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा सफारी आणि अवैध शस्त्र जप्त केली आहेत. पोलिसांना एका व्यक्तीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सफारीला थांबवायचा प्रयत्न केला, ज्याची नंबर प्लेट तुटलेली होती. तपासणीसाठी पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी भरधाव वेगाने सफारी घेऊन पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला कॅन्टोन्मेंटच्या हनुमान गंज तिराहे येथून अटक केली. 

दरम्यान, एटीएम बदलून लोकांची फसवणूक करणारा नटवरलाल बजरंग बहादूर असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले. तो मुंबईतून आपली टोळी चालवत होता आणि त्याची टोळी देशभरातील एटीएम बदलून लोकांची फसवणूक करत असे. अटक करण्यात आलेला टोळीचा म्होरक्या बजरंग हा प्रतापगड जिल्ह्यातील जेठवारचा रहिवासी असून तो कानपूर विद्यापीठातून बीए पास आहे.  आरोपीला घातल्या बेड्या या टोळीने बस्ती येथील अनेक ठिकाणी एटीएम बदलून फसवणूक केली आहे. नटवरलाल हा २६ ऑगस्ट रोजी पाकवालिया पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. पोलीस अनेक दिवसांपासून या टोळीचा शोध घेत होते, माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या माहितीवरून पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला अखेर अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. सीओ शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, या टोळीच्या म्होरक्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीatmएटीएमfraudधोकेबाजीArrestअटक