शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

अद्दल घडवली ! हुंडा मागणाऱ्या नवरदेवाचं लग्नाच्याच दिवशी केलं मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:57 PM

विवाह सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वी बाईक आणि सोन्याच्या साखळीची मागणी करणाऱ्या नवरदेवाला नववधुच्या कुटुंबीयांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

लखनौ - विवाह सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वी बाईक आणि सोन्याच्या साखळीची मागणी करणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. अशी अद्दल घडवली आहे की तो आयुष्यभर ती विसरू शकणार नाही.  या विषयाची चर्चा सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशात सुरू आहे. मुलीच्या कुटुंबीयांकडे बाईक आणि सोनसाखळीची मागणी करणाऱ्या या नवरदेवाचं लग्नाच्या दिवशीच मुंडण करण्यात आलं. मुंडण केलेल्या या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

मुलीच्या आजीनं सांगितले की, नवरदेवानं लग्नाच्या 5 दिवसांपूर्वी बाईक आणि सोन्याची साखळी देण्याची मागणी केली. या मागण्यांची पूर्तता करण्याचेआम्ही फेटाळून लावल्यानंतर नवरदेवानं लग्न करण्यास नकार दिला. यानंतर लग्नाच्याच दिवशी त्याचे केस कापण्यात आल्याची माहिती मिळाली. पण त्याचे केस कोणी कापले हे आम्हाला माहिती नाही.  

मुलाचे केस आम्ही कापले नाहीत, असे स्पष्टीकरण मुलीच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत आहे. पण, हुंडा मागणाऱ्या या लालची नवरदेवाचं मुंडण केले तरी कोण?, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.

हुंड्याचे हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी नवरदेवाचे केस कोणी कापले?, यामागील सूत्रधार कोण?, याची माहिती कोणालाच माहीत नाही. लग्नाच्या दिवशी जेव्हा मुलाच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, तर त्यानं थेट लग्नास नकार दिला. 

लग्न न करण्याची मुलानं दिलेली कारणं ऐकाल तर संताप होईल. मुलगी व्हॉट्सअॅपवर अधिक वेळ असते, असे सांगत त्यानं सुरुवातीस लग्न करण्यास नकार दिला. यानंतर त्यानं 65 लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या मागण्या हनुमानाच्या शेपटीसारख्या वाढत असल्याचे पाहून अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. याप्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :dowryहुंडाUttar Pradeshउत्तर प्रदेश