शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचा कौलही आता स्पष्ट होऊ लागले आहेत.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचा कौलही आता स्पष्ट होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर सुरू आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपा 54 तर महाआघाडी 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.  

उत्तर प्रदेशातील भाजपाचे बहुतांश दिग्गज नेते आघाडीवर आहेत. मात्र  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर पडले आहेत. मात्र अखिलेश यादव आझमगड आणि मुलायमसिंह यादव आघाडीवर आहेत. दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भाजपाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली आहे. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  उत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश नेमका कुणाला साथ देतोय हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र येथे महाआघाडीने भाजपाला मात दिल्यास लोकसभेत बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागू शकतो. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस