शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

अमेठी, रायबरेलीमधून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार? ज्येष्ठ नेत्याने दिले सूचक संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:00 AM

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधील आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप  केलेली नाही. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनी यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत दिले आहेत.

कोणे एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची अवस्था सध्या बिकट झालेली आहे. येथील अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांमध्येही काँग्रेसचं पूर्वीसारखं वर्चस्व राहिलेलं नाही. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधील आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप  केलेली नाही. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनी यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशातून राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात. यावेळी अँटोनी यांनी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या निवडणूक लढवण्याबाबत केलेल्या दाव्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. 

अमेठी आणि रायबरेली हे गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ राहिले आहेत. तसेच अपवाद वगळता गांधी कुटुंबीय येथून सातत्याने विजयी होत आले आहेत. मात्र २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का दिला होता. आता स्मृती इराणी ह्या अमेठीमधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र काँग्रेसने येथील उमेदवारीबाबत गोपनियता बाळगली आहे. तर रायबरेलीमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे.  येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २६ एप्रिल ते ३ मे ही असेल. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के. अँटोनी यांनी काल सांगितले की, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीतरी एकजण उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तुम्ही अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारांची नावं जाहीर होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहा. तर्कवितर्क लढवण्यात काही अर्थ नाही. नेहरू-गांधी कुटुंबातील एक सदस्यच उत्तर प्रदेशातून लोकसभेची निवडणूक लढेल. 

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता अँटोनी यांनी असं होणार नाही असे सांगितले. तसेच देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांचा गांधी कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे, असा दावाही अँटोनी यांनी केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४amethi-pcअमेठीrae-bareli-pcरायबरेली