उत्तर प्रदेशातील मेरठमधून प्रेमसंबंधाची एक अशी घटना समोर आली आहे, जिची कल्पना कधी प्रियकर आणि प्रेयसीनेही केली नसेल. रात्रीच्या अंधारात दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असतानाच गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले आणि रात्रीच त्यांचा निकाह लावण्यात आला.
मवाना येथील मोहल्ला कल्याण सिंहमध्ये राहणाऱ्या अलफात नावाच्या तरुणाचे परीक्षितगढमधील एका गावातील तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मंगळवारी सायंकाळी तरुणीचे कुटुंबीय डॉक्टरांकडे गेले होते. कुटुंबीय घरी नसल्याचे पाहून प्रेयसीने फोन करून प्रियकर अलफातला घरी बोलावले. अलफात आपल्या काही मित्रांना घेऊन तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता.
रात्रीच्या अंधारात दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असतानाच, काही गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी त्या घराला वेढा घातला. गावकऱ्यांची चाहूल लागताच अलफातचे मित्र त्याला तेथेच सोडून पळून गेले. गावकऱ्यांनी लगेच मुलीच्या कुटुंबीयांना फोन करून घरी बोलावले. कुटुंबीयांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले आणि तरुणाला बंधक बनवले.
मुलीच्या घरच्यांनी कायदेशीर कारवाईची धमकी दिल्यानंतर, मुलाच्या कुटुंबीयांनी थोडा वेळ मागितला. रात्रीच तातडीने पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आणि अखेरीस दोघांचा निकाह (विवाह) लावण्यावर सहमती झाली.
यावर लगेचच काझींना बोलावण्यात आले. तातडीने वधूला सजवण्यात आले आणि रात्री उशिरा धार्मिक विधीनुसार दोघांचा निकाह पार पडला. या निकाहचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर तरुणीची तिच्या प्रियकराच्या घरी पाठवणी करण्यात आली.
Web Summary : In Uttar Pradesh, a couple was caught by villagers during a secret rendezvous. Friends fled, and the families convened a panchayat. To resolve the situation, the couple was immediately married in a Nikah ceremony.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक गुप्त मुलाकात के दौरान ग्रामीणों ने एक जोड़े को पकड़ लिया। दोस्त भाग गए, और परिवारों ने पंचायत बुलाई। स्थिति को हल करने के लिए, जोड़े का तुरंत निकाह समारोह में विवाह कर दिया गया।