शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही, नवरीनं वरात दरवाजात येताच मोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 13:42 IST

यानंतर लग्ना लावून देणाऱ्या मध्यस्थाला मुलाचा चश्मा काढण्यास सांगण्यात आले. यावर मुलाने चश्मा काढला. यानंतर त्याला (नवरदेव शिवम) विधी करायला सांगण्यात आले, मात्र, त्याला विना चश्म्याचा अडथळा येत होता.

लखनौ - आपण लग्न मोडल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील आणि बघितल्याही असतील. मात्र उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही म्हणून नवरीनं लग्न मोडल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर मुलीकडच्यांनी नवरदेवाकडील लोकांवर गुन्हादेखील दाखल केला आहे. या नवरदेवाला चश्मा न लावता वाचता न आल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला. 

ज्या घरात 2 दिवसांपूर्वीच मंगलगीतांचा आवाज ऐकायला येत होता, त्याच घराच्या दरवाज्यावर वरात पोहोचताच नवरदेवाला चश्म्यावर पाहून सर्वांनाच धक्काच बसला. यानंतर मुली कडच्यांनी संबंधित मुलाला चश्म्याशिवाय काहीही दिसत नाही, असा आरोप केला आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यातील जमालीपूर येथील आहे. या गावातील अर्जुन सिंह यांनी आपली मुलगी अर्चना हीचा विवाह बंशी पोलीस ठाणे क्षेत्रातील अछल्दा येथील शिवम नावाच्या तरुणाशी निश्चित केला होता. यानंतर संपूर्ण तयारीसह लग्न उत्सव आणि लग्नाची तारीखही काढण्यात आली. मुलीकरडच्यांनीही संपूर्ण तयारी केली होती. एवढेच नाही, तर हुंड्याच्या स्वरुपात दूचाकी आणि रोख रक्कमही देण्यात आली होती. यानंतर निश्चित करण्यात आलेल्या तारखेला, म्हणजेच  20 जूनला वरात दारात आल्यानंतर नवरदेवाने संपूर्ण वेळ चश्मा लावूनच ठेवला होता. यामुळे घरातील महिलांना आणि मुलीच्या वडिलांना शंका आली.

यानंतर लग्ना लावून देणाऱ्या मध्यस्थाला मुलाचा चश्मा काढण्यास सांगण्यात आले. यावर मुलाने चश्मा काढला. यानंतर त्याला (नवरदेव शिवम) विधी करायला सांगण्यात आले, मात्र, त्याला विना चश्म्याचा अडथळा येत होता. त्याची दृष्टी बरीच कमकुवत होती. हे पाहून वधू अर्चनाने लग्न करण्यास आपण तयार नसल्याचे सांगितले. यावर वधू पक्षाचे एकमत झाले. त्यांनी हुंड्यात दिलेली रोख रक्कम आणि दूचाकी परत करण्याची मागणी केली. यावर मुलाकडच्यांनीही काहीही देण्यास नकार दिला. यानंतर मुलीकडच्यांनी औरेया पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी