शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गो-तस्करी करणारी ट्रक घुसला घरात, 6 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:56 IST

नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली.

ठळक मुद्देअवैधरित्या जनावरांची केली जात होती तस्करीपोलीस करत होते ट्रकचा पाठलाग, ट्रक घुसला घरामध्येदुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू

लखनौ - नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये आणखी दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

(गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य)

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची तस्करी केली जात होती. जनावरं घेऊन जाणारा ट्रक बिहारच्या दिशेनं प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या ट्रकचा पाठलाग करत होते. पोलिसांच्या भीतीपोटी चालक ट्रक भरधाव चालवत होता. यादरम्यान, चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये ट्रक घुसला आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. 

(कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त)

साखरझोपेत असतानाच या सहा जणांवर काळानं घाला घातला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  या घटनेविरोधात स्थानिकांनी तीव्र संपात व्यक्त करत रास्तारोको आंदोलन केले. शिवाय, पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिले नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डीएम आणि एसपींनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणा आरोप केला आहे. याप्रकरणी सहाहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशcowगाय