Yogi Adityanath : 'बबुआ ट्विटर ही वोट देगा'; अखिलेश यादव यांच्या ट्वीट्सवरून योगी आदित्यनाथांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 22:24 IST2021-11-06T22:24:10+5:302021-11-06T22:24:30+5:30
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इटावामध्ये विरोधकांवर साधला जोरदार निशाणा.

Yogi Adityanath : 'बबुआ ट्विटर ही वोट देगा'; अखिलेश यादव यांच्या ट्वीट्सवरून योगी आदित्यनाथांचा टोला
इटावा येथे पोहोचलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "कोरोना कालावधीत दमी तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन वेळा आलो. व्यवस्था पाहण्यासाठी दोन्गी आमदार, खासदार यांच्यासोबत जिल्हा प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना वॉरिअर्ससह मिळून लोकांची मदत केली. त्यादरम्यान, दुसऱ्या पक्षाचे लोक होम आयसोलेशनमध्ये होते," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. सपाचा गढ मानल्या जाणाऱ्या इटावामध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"जे लोक संकटादरम्यान आपल्या घरात बसून राहिले, त्यांना निवडणुकीदरम्यानही घरातच बसण्याची आवश्यकता आहे. त्यांना घरातचं बसवलं पाहिजे. जो संकट कालावधीत तुमच्या सोबत उभा राहू शकला नाही, तुमच्या दु:खात सहभागी होऊ शकत नाही, वेळ आल्यावर त्याला उत्तर देण्याची गरज आहे," असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांचाही समाचार घेतला. जे लोक ट्विटरवरच मर्यादित होते, त्यांना ट्विटरच मत देईल हे सांगा, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
#WATCH | I had come here twice during Corona. But people of other parties were in home isolation, at home when you were in a crisis.They should stay there even during polls.They need to be answered just like that. Tell them, "Babua, ye Twitter hi vote bhi de dega: UP CM in Etawah pic.twitter.com/NfhXLHse62
— ANI UP (@ANINewsUP) November 6, 2021
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी माफिया आणि गुन्ह्यांबाबतही इशारा दिला. "आता माफियांवर बुलडोदर चालत आहे, पुढे त्यांना समर्थन देणाऱ्यांचाही नंबर येणार आहे," असं त्यांनी नमूद केलं. ज्यांना तुरूंगात टाकलं जात आहे, त्यांच्याशी हात मिळवून सरकार आलं तर काय होईल? अशा लोकांचं मनसुबे समजणं आवश्यक आहे, असं ते कोणाचंही नाव न घेता म्हणाले. पूर्वीचं सरकार बेईमानी, भ्रष्टाचार करत होतं. पूर्वी पैसा कब्रस्तानच्या बाऊंड्रीवॉल तयार करण्यात जात होता, आता तो गरीबांच्या कामी येत आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
मुलायम सिंग कुटुंबीयांवर निशाणा
"यापूर्वी सरकारमध्ये एकाच कुटुंबाबात विचार केला जात होता. परंतु आमचं सरकार २५ कोटी जनतेचा विचार करून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० कोटी जनतेला मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन इतिहास रचला आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. "इटावाच्या भूमीवर जन्मलेल्या काही लोकांनी लस घेण्यास विरोध केला होता. यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात लस घेऊन निवडणुकीत काय करणार आहात हे सिद्ध केलं," असंही योगी आदित्यनाथ यांनी नमूद केलं.