शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

उत्तर प्रदेश सरकार कोरोनाच्या विळख्यात, योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाले होते आयसोलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:58 IST

योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath)

लखनौ - उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath Tests Positive For Coronavirus)

मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करत आहे. सर्व कामे व्हर्च्युअली सुरू आहेत. तसेच राज्य सरकारची सर्व कामे सर्वसामान्यपणे सुरू आहेत. यादरम्यान जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी 5 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने मुख्यमंत्री कार्यालयालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मंगळवारी  मुख्यमंत्र्यांच्या जवळील अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव शशी प्रकाश गोयल, विशेष सचिव अमित कुमार सिंह, ओएसडी अभिषेक कौशिक तसेच एका पर्सनल सेक्रेटरी आणि एका पर्सनल असिस्टंटलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते.कोरोना मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयापासून ते त्यांच्या सरकारी निवासस्थानापर्यंत सतर्कता बाळगली जात आहे. प्रशासन आणि सरकारमध्ये अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेश