शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

"सोशल मिडिया म्हणजे 'बेलगाम घोडा', कुणीही 'माय-बाप' नाही"; CM योगींनी कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 11:27 IST

सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल.

लखनौ - यूपी निवडणुकीपूर्वी राज्यात आपल्या तयारीत व्यस्त असलेल्या भाजपने आता सोशल मिडियावरही लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. खुद्द सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. एवढेच नाही तर, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सतर्क राहायला सांगितले आहे. जर ते सतर्क राहिले नाही, तर प्रेसचे लोक त्यांना मिडिया ट्रायल्सचा बळी बनवू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath said social media is a belagam ghora)

अजून एका ठिकाणाचे नाव बदलणार योगी सरकार, केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री योगी म्हणाले, टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्र चालविणारे लोक औद्योगिक घराण्यांचे आहेत. पण सोशल मीडियालाला कुणीही माय-बाप नाही. टीव्ही आणि वर्तमानपत्रांमधील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक आहेत. परंतु सोशल मिडियावर अशी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे, अशा बेलगाम घोड्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे तशा प्रकारचे प्रशिक्षण आणि तशा प्रकारची तयारी असणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

पेगाससचा सामना करण्यासाठी मुहूर्त बघू नका -कार्यकर्त्यांना सतर्क करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, अलीकडेच यूपीच्या घटनांसंदर्भात जगातील अनेक देशांमध्ये मिडिया ट्रायल्स करण्यात आले. या घटनांमध्ये ज्या लोकांचा उत्तर प्रदेशशी काहीही संबंध नाही, असे लोकही सामील होते. तसेच, पेगासस स्पायवेअरसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, याला काउंटर करण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत, असे आयटी सेलच्या लोकांना सांगितले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक