शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 19:54 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लखनौ - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. आता याचा प्रकोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath said i have been isolated myself)

योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्विटर करून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ''माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते, त्यामुळे खबरदारी म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सर्व कामे व्हर्च्युअली सुरू करत आहे.''

CoronaVirus Update : 'या' 10 राज्यांत कोरोनाचा कहर, महाराष्ट्रासह तीन राज्यांची स्थिती सर्वात वाईट!

उत्तर प्रदेशात कोरोनाचं थैमान -उत्तर प्रदेशातही कोरोनाने थैमान घातले आहे. येथेही कोरोनाने मागील सर्वच विक्रम मोडले आहेत. गेल्या 24 तासांत येथे तब्बल 18,021 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी ही माहिती दिली. तर गेल्या 24 तासांत 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी राज्‍यात 11 एप्रिलला एका दिवसात सर्वाधिक 15,353 नवे कोरोबाधित आढळून आले होते. तर 12 एप्रिलला एका दिवसात सर्वाधिक 72 सक्रमितांचा मृत्यू झाला होता.

Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय!

अमित मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डिस्चार्ज देण्यात आलेल्या लोकांची संख्या 3,474 आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 95,980 एवढी आहे. आतापर्यंत एकूण 9,309 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच आतापर्यंत उत्तर प्रेदेशात 3,71,73,548 सॅम्पलची तपासणी झाली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा