योगी आदित्यनाथांचा ‘जबरा फॅन’, मुस्लीम तरूणानं छातीवर गोंदवला मुख्यमंत्र्यांचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 00:11 IST2022-06-14T00:11:24+5:302022-06-14T00:11:48+5:30
Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांचा हा फॅन अतिशय निराळा आहे. त्यानं आपल्या छातीवर त्यांचा टॅटू गोंदवला आहे.

योगी आदित्यनाथांचा ‘जबरा फॅन’, मुस्लीम तरूणानं छातीवर गोंदवला मुख्यमंत्र्यांचा टॅटू
अनेकदा तुम्ही आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं किंवा बॉलिवूडच्या कलाकाराचं, एखाद्या सेलिब्रिटीचं नाव कोणी ना कोणी गोंदवलेलं पाहिलंच असेल. परंतु एखाद्या राजकारणी व्यक्तीला किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रती मनात इतकं प्रेम की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना गिफ्ट देण्यासाठी आपल्या शरीरावर त्यांचा टॅटू गोंदवून घेतला असेल, असं जर तुम्हाला कळालं तर? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असाच एक जबरी फॅन आहे.
या व्यक्तीचं नाव यामीन सिद्दीकी असं आहे. २३ वर्षीय यामीन योगी आदित्यनाथ यांना आपला आदर्श मानतो. जनपद फर्रूखाबाद आणि मैनपुरीच्या सीमेवर असलेल्या एका गावात त्यांचं घर आहे. तसंच या ठिकाणी त्यांचा फुटवेअरचा व्यवसायही आहे.