शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: ना सायकल, ना हत्ती, ना हात.. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगी आदित्यनाथ यांनाच साथ; BJP खासदार Ravi Kishan यांचा विरोधकांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:01 IST

यूपीच्या जनतेनं रामराज्याची निवड केली, असंही रवि किशन म्हणाले.

Uttar Pradesh Assembly elections Result 2022: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने (BJP) धडाकेबाज विजयाच्या दिशेने आगेकूच केली. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या चार तासांतच चित्र जवळपास स्पष्ट झालं. भाजपाने ४०३ पैकी २५०+ जागांवर आघाडी मिळवली. भाजपाच्या विजयाचं चित्र स्पष्ट होताच नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. यूपीच्या जनतेने रामराज्याची निवड केली असं मत खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांनी व्यक्त केलं.

"उत्तर प्रदेशच्या जनतेने मनात पक्क केलं होतं की यूपीमध्ये रामराज्य आणायचं. रामराज्य साकारण्याची सुरूवात यूपीच्या जनतेने केली आहे. नवं उत्तर प्रदेश आणि नवीन भारताच्या दिशेने आगेकूच करण्याच्या उद्देशाने यूपीच्या जनतेने त्यांचं भविष्य निवडलं आहे. आता अखिलेश यादव आणि त्यांचे मित्रपक्षांना कोणत्या गोष्टीचा घमंड असेल? कारण त्यांचा मोठा पराभव झालाय. विरोधकांना मी सांगू इच्छितो की ना सायकल, ना हत्ती, ना हात... उत्तर प्रदेशच्या जनतेची योगींनाच साथ", अशा शब्दात गोरखपूर मतदारसंघातील भाजपाचे खासदार रवि किशन यांनी आनंद व्यक्त केला. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

उत्तर प्रदेशात सर्व ४०३ जागांचे कल हाती आले. भाजपने २६९ जागांवर मोठी आघाडी घेतली. तर सपा १२३ जागा, बसपा ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर असल्याचं दिसलं. दुपारी १ वाजेपर्यंत गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या रायबरेली येथे काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर राहिले. दुपारी १ वाजेपर्यंत योगी आदित्यनाथ १६ हजार ५६९, समाजवादी पक्षाच्या सुभाती शुक्लांना ४ हजार २९०, काँग्रेसच्या चेतना पांडे २२६ मते, बसपचे ख्वाजा शमसुद्दीन यांना १०४२ मते मिळाली होती.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव