Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या मित्रपक्षांना हव्यात जास्त जागा; ओबीसी नेते सपात गेल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:19 AM2022-01-18T06:19:02+5:302022-01-18T06:19:25+5:30

अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव

Uttar Pradesh Assembly Election BJPs allies want more seats | Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या मित्रपक्षांना हव्यात जास्त जागा; ओबीसी नेते सपात गेल्याचा परिणाम

Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या मित्रपक्षांना हव्यात जास्त जागा; ओबीसी नेते सपात गेल्याचा परिणाम

Next

- शरद गुप्ता

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून ओबीसी वर्गाच्या तीन मंत्र्यांसह दीड डझन आमदार बाहेर पडल्यामुळे, त्याच्या इतर मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे.

अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव आहे. या समाजाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशात असल्यामुळे व तिकडे शेवटच्या २ टप्प्यात मतदान असल्यामुळे दोन्ही पक्ष घाई करीत नाहीत. अपना दलने २०१७ मध्ये १२ जागा लढविल्या व ९ जिंकल्या. आता पक्षाच्या अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी २० जागा मागितल्या असून, भाजपने १४ जागांची तयारी दाखविली आहे.

दुसरा मित्र पक्ष निषाद पार्टी २०१७ मध्ये भाजपसोबत नव्हती. त्याने तेव्हा ७२ जागा लढवल्या. एकही जिंकली नाही. आता त्याला २५ जागा हव्या आहेत, तर भाजपने १७ जागांची तयारी दाखविली आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर गोरखपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत निषाद पार्टीचे प्रवीण निषाद यांनी सपाकडून लढून भाजपचे उमेदवार रवि किशन यांना पराभूत केले. नंतर एका वर्षाने प्रवीण वडील डॉ. संजय निषाद यांच्यासह भाजपमध्ये दाखल झाले व संत कबीरनगर मतदारसंघातून लोकसभेत गेले.

संजय निषाद म्हणाले...
संजय निषाद यांचे म्हणणे असे की,“गंगा, यमुना, शारदा आणि घाघरा नदीच्या काठांना उत्तरेकडून दक्षिण उत्तर प्रदेशपर्यंत जवळपास १०० विधानसभा मतदारसंघात आमचा प्रभाव आहे.
तरीही आम्ही फक्त २५ जागा मागत आहोत.” अनुप्रिया पटेल यांना अपनी पार्टीच्या वाढत्या प्रभावाला पाहून जास्त जागा हव्या आहेत.

Web Title: Uttar Pradesh Assembly Election BJPs allies want more seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app