'यूपी फिर मांगे भाजपा सरकार', योगी आदित्यनाथांनी लाँच केलं निवडणूक प्रचार गीत, सपाला थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:41 PM2022-01-21T19:41:57+5:302022-01-21T19:42:33+5:30

Uttar Pradesh Assembly election 2022 : या थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे.

Uttar Pradesh Assembly election 2022 CM Yogi Adityanath launches bjp election theme song | 'यूपी फिर मांगे भाजपा सरकार', योगी आदित्यनाथांनी लाँच केलं निवडणूक प्रचार गीत, सपाला थेट प्रत्युत्तर

'यूपी फिर मांगे भाजपा सरकार', योगी आदित्यनाथांनी लाँच केलं निवडणूक प्रचार गीत, सपाला थेट प्रत्युत्तर

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक प्रचाराला धार देण्यासाठी एक नवे गाणे लाँच केले आहे. सपाच्या "अखिलये आये" या निवडणूक गीतानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आज भारतीय जनता पक्षाचे निवडणूक गीत रिलीज केले. भाजपच्या उत्तर प्रदेश ट्विटर हँडलवरून ट्विट करून पक्षाने ही माहिती दिली. या थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे.

ट्विटरवर या गाण्याचे बोलही लिहण्यात आले आहेत, ते असे - "प्रयागराज से मथुरा, काशी तक
लखनऊ से लेकर झांसी तक
अयोध्या से बिठूर तक
शहर-गांव सब दूर-दूर तक
गाजीपुर से गाजियाबाद से
यूपी भर में शंखनाद से
सुनाई पड़ती है यही हुंकार
यूपी फिर मांगे भाजपा सरकार
#फिर_से_बीजेपी"

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, "आज भाजपने आपल्या निवडणूक सामग्रीसोबतच थीम सॉंगदेखील जारी केले. मी या गाण्याला आवाज देण्याऱ्याचे आणि हे गाणे यशस्वीपणे तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो."

योगी म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी आम्ही आमचा लोककल्याणाचा संकल्प घेऊन वाटचालीला सुरुवात केली होती. त्यावेळी आम्ही राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन या मार्गाने ध्येय गाठण्याचा संकल्प केला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, आमच्या पक्षाने जे संकल्प केले होते, ते सर्व भाजप सरकारने पूर्ण केले आहेत. उत्तर प्रदेशातील आमच्या सरकारने सुरक्षिततेचे उत्तम वातावरण निर्माण केले आहे. याशिवाय राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या संधीही उपलब्ध केल्या. पंतप्रधानांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आम्ही आमचे ब्रीदवाक्य बनवे आणि त्यानुसार कार्य केले." यावेळी योगींनी भाजप सरकारने उत्तर प्रदेशात केलेल्या कामांची आणि योजनांचीही माहिती दिली.

Web Title: Uttar Pradesh Assembly election 2022 CM Yogi Adityanath launches bjp election theme song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.