Uttar Pradesh Assembly Election 2022 : युपीत भीम आर्मीच्या 33 जागांची घोषणा, सपासोबत आघाडी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:04 PM2022-01-18T19:04:39+5:302022-01-18T19:13:44+5:30

गेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतु, त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे

Uttar Pradesh Assembly Election 2022: Announcement of 33 seats of Bhim Army in UP, no lead with SP | Uttar Pradesh Assembly Election 2022 : युपीत भीम आर्मीच्या 33 जागांची घोषणा, सपासोबत आघाडी नाहीच

Uttar Pradesh Assembly Election 2022 : युपीत भीम आर्मीच्या 33 जागांची घोषणा, सपासोबत आघाडी नाहीच

Next

मेरठ - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने भीम आर्मीसोबत जाण्यात रस न दाखविल्याने अखेर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी सपासोबत जात नसल्याची घोषणा केली. राज्यात आता निवडणुकीचे वारे सुरु झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून सकारात्मक सुरू असलेली चर्चा अखेरच्याक्षणी फिस्कटली आहे. त्यानंतर, चंद्रशेखर यांनी उत्तर प्रदेशात भीम आर्मीच्या 33 जागांची घोषणा केली. तसेच, काहीही झाले तरी सपासोबत जाणार नसून भीम आर्मी किती जागा लढवणार हेही लवकरच जाहीर करू, असे सांगितले. 

गेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतु, त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे. त्यांना फक्त आमची मते हवी आहेत. त्यामुळे, आम्ही सपासोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले होते. तसेच, विधानसभा मतदारसंघाची घोषणाही केली आहे. 

चंद्रशेखर यांनी सांगितल्यानुसार, मेरठ, सहारनपुर, मुजफ्फरनगर, बिजनौर, हापुड़, आगरा, बुलंदशहर, एटा, मथुरा, संभल, आजमगढ़, कौशाम्बी, गाज़ीपुर, उन्नाव, लखनऊ, लखीमपुर, सीतापुर, सुल्तानपुर जिलों की हस्तिनापुर, खुर्जा,मेरठ कैंट, रामपुर मनिहारन, देवबंद, गंगोह, सहारनपुर देहात, चरथावल, पुरकाजी, मुजफ्फरनगर शहर, धामपुर, नहटौर, हापुड, नूरपुर, आगरा साउथ, नोएडा, चंदौसी, कुंदरकी, आलापुर, जखनिया, सिराथू, मलीहाबाद, पलिया, मुबारकपुर, मोहम्दाबाद, हरगांव, जलेसर,एत्मादपुर, सगड़ी, जयसिंहपुर, तिर्वा आणि माट या विधानसभा मतदारसंघातून भीम आर्मीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 33 जागांवर निडवडणूक लढवणार आहे. विशेष म्हणजे सपाने आता 100 जागांची जरी ऑफर दिली, तरी आपण त्यांच्यासोबत जाणार नाही. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या मतदारसंघात भीम आर्मी आपला उमेदवार देणार नाही, अशी घोषणाही चंद्रशेखर यांनी केली. 
 

Web Title: Uttar Pradesh Assembly Election 2022: Announcement of 33 seats of Bhim Army in UP, no lead with SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app