बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 08:54 AM2020-11-20T08:54:38+5:302020-11-20T08:55:02+5:30

Accident News : प्रयागराज-लखनौ महामार्गावर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव बोलेरोने उभ्या असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेमुळे झाला.

Uttar Pradesh : 14 persons died after the vehicle they were travelling in collided with a truck on Prayagraj-Lucknow highway | बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल रात्री प्रयागराज-लखनौ महामार्गावर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव बोलेरोने उभ्या असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेमुळे झाला. बोलेरो चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे.

अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत असलेले प्रवासी हे वरातीवरून येत होते. ही सर्व मंडळी शेखपूर गावात झालेल्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतत होती. परतत असताना सदर बोलेरो माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असताना ती जाऊन उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्याच बोलेरोचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एकूण १४ मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे.



अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गॅस कटरच्या मदतीने बोलेरो गाडी कापत सर्व १४ मृतदेह बाहेर काढले. संपूर्ण मदतकार्यासाठी दोन तास लागले. दरम्यान,पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार बोलेरोमधील १२ वऱ्हाडी हे कुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिगरापूर चौसा गावातील होते. तर बोलेरोचालकासह अन्य दोघे हे दुसऱ्या एका गावातील होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन पीडित व्यक्तींची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

Web Title: Uttar Pradesh : 14 persons died after the vehicle they were travelling in collided with a truck on Prayagraj-Lucknow highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.