शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सायबर हल्ल्यांसाठी होऊ शकताे हॅकर्सचा वापर, अहवालामध्ये व्यक्त केली गेली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:43 IST

Cyber Attack : जागतिक सायबर सुरक्षा संस्था, मॅकएफी एंटरप्रायजेसने फायरआयच्या मदतीने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, व्यापारी संस्थांत घुसखोरी करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापरही असे देश करू शकतात.

नवी दिल्ली : इतर देशांच्या ऑनलाईन व ऑफलाईन इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्यासाठी विविध देशांकडून आतापर्यंत समर्पित पथकांचा वापर केला जात होता. मात्र, २०२२ मध्ये अशा देशांकडून थेट हॅकर्स कामावर ठेवून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे.जागतिक सायबर सुरक्षा संस्था, मॅकएफी एंटरप्रायजेसने फायरआयच्या मदतीने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, व्यापारी संस्थांत घुसखोरी करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापरही असे देश करू शकतात. अधिकाधिक व्यावसायिकांना लक्ष्य करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून समाजमाध्यमांचा शस्त्रासारखा वापर केला जाईल. आपल्या गुन्हेगारी लाभासाठी सरकारी यंत्रणांची संस्थांत घुसखोरी करणे नवे नसले, तरी आजपर्यंत ही बाब तुलनेने दुर्मिळ स्वरूपात होती.अहवालात म्हटले आहे की, एखाद्याला व्यक्तीश: लक्ष्य करणे हे अत्यंत यशस्वी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. या साधनाचा वापर वाढेल, असा आमचा अंदाज आहे. केवळ हेरगिरी समूहाच्यामार्फतच नव्हे, तर इतर धोकादायक व्यक्ती व संस्थांच्या मार्फतही या साधनांचा वापर करून घेतला जाऊशकतो.अहवालात पुढे म्हटले आहे की, सायबर गुन्हेगारांनी २०२१ मध्ये ज्या यशस्वी युक्त्या वापरल्या, त्याचा वापर करून २०२२ साठी अधिक अद्ययावत साधनांचा विकास ते करू शकतात. त्याचा वापर जगभरात हाहाकार उडवून देण्यासाठी केला जाऊ शकतो.

नवे सायबर कल काय आहेत, याबाबत अद्ययावत राहावेमॅकएफी आणि फायरआयचे मुख्य शास्त्रज्ञ राज समानी यांनी सांगितले की, सायबर सुरक्षेचा वाढता धोका आणि जागतिक साथीचा कायम असलेला परिणाम या पार्श्वभूमीवर व्यावसायिक संस्थांनी नवे सायबर कल काय आहेत, याबाबत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. याद्वारे त्यांना आपल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय राहता येऊ शकते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम