शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारमाध्यमांना घाबरवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा होतोय वापर

By admin | Updated: June 10, 2017 00:27 IST

खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवर केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) कारवाईविरोधात शुक्रवारी येथील प्रेस क्लबमध्ये प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रकाशझोतात आला.

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवर केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) कारवाईविरोधात शुक्रवारी येथील प्रेस क्लबमध्ये प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रकाशझोतात आला. क्लबमध्ये मोठ्या संख्येने पत्रकार एकत्र आले होते. सरकार प्रसारमाध्यमांना भीती घालण्यासाठी सीबीआयसह इतर तपास यंत्रणांचा वापर करीत आहे, अशी शंका अनेक पत्रकारांनी व्यक्त केली. आणीबाणीच्या दिवसांचा संदर्भ देऊन पत्रकारांनी आजची परिस्थिती तर तेव्हापेक्षाही वाईट असल्याचे म्हटले.माजी केंद्रीय मंत्री व प्रसिद्ध पत्रकार अरूण शौरी म्हणाले की, ‘‘मोदी सरकार प्रसार माध्यमांना जाहिराती देऊन त्यांचे तोंड बंद करीत आहे व जे सरकारसोबत नाहीत त्यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयची भीती घातली जात आहे.’’ सरकारला उघड आव्हान देताना शौरी यांनी माध्यमांवर ज्यांनी हात उगारला त्यांना जावे लागले, असा इशारा दिला. आज एकावर हात टाकला गेला. उद्या तुमचा क्रमांक असेल. त्यामुळे आवाज खणखणीत होऊ द्या व मंत्र्यांवर बहिष्कार घाला, असेही शौरी म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार एच. के. दुआ म्हणाले की, ‘‘आम्ही एक झालो नाही तर दूरचित्रवाणी वाहिनीचे जे काही झाले तीच गत आमचीही होईल.’’ सीबीआयने केलेली कारवाई ही धोक्याची घंटा असल्याचे सांगून सावध राहण्याची गरज त्यांनी सांगितली. प्रसिद्ध विधिज्ञ फली नरीमन म्हणाले की,‘‘जेव्हा प्रचंड बहुमतांनी सरकारे आली त्यावेळी अशा संकटांना तोंड द्यावे लागले आहे.’’ त्यांनी मलेशियातील घटना सांगितली. ते म्हणाले, ‘‘तेथील घटनेने बोलण्याचे स्वातंत्र्य तर दिले पण बोलण्यानंतरचे स्वातंत्र्य नाही.’’