शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
3
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
4
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
5
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
6
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
7
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
8
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
9
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
10
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
11
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
12
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
13
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
14
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
15
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
16
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
17
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
18
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
19
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
20
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
Daily Top 2Weekly Top 5

नोटांऐवजी चेक, क्रेडिट कार्डचा वापर करा- जेटली

By admin | Updated: March 27, 2015 23:39 IST

काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चेक व प्लास्टिक चलनाच्या (क्रेडिट, डेबिट कार्ड) वापराला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे केले.

नवी दिल्ली : काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चेक व प्लास्टिक चलनाच्या (क्रेडिट, डेबिट कार्ड) वापराला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे केले. अर्थव्यवस्थेची वृद्धी होत असताना काळ्या पैशाला आळा घालण्याचा एक उपाय आहे. हा उपाय म्हणजे अधिकाधिक लोकांनी कागदी नोटांचा वापर टाळून धनादेश व प्लास्टिक चलन वापरावे, असे जेटली म्हणाले. ते सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि.च्या स्थापनदिन सोहळ्यादरम्यान बोलत होते. ही कंपनी देशाचे कागदी चलन, नाणी, पदके आणि वजन-मापे तयार करते. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांत चलनाचे अधिकाधिक मूल्य हे १०० डॉलर किंवा ५० पौंड आहे. कागदी चलनाचा (नोटा) वापर कमी करून प्लास्टिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. याच दृष्टिकोनातून सरकार मोठ्या रोख व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. काही उपाय घोषितही केले गेले असून त्यामुळे रोकडचा वापर करणे कठीण बनले आहे. या उपायामुळे बेहिशेबी रकमेला आळा बसेल. ४२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जेटली यांनी काळ्या पैशांच्या समस्येविरुद्ध उपाययोजना केल्या असून त्यात मालमत्ता खरेदी किंवा इतर तत्सम व्यवहारात संबंधितांना रोख व्यवहार करण्यापासून परावृत्त करण्याचा समावेश आहे. सरकारने रोख व्यवहारावर निर्बंध घालताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ४एक लाख रुपयांवरील प्रत्येक खरेदी-विक्रीसाठी पॅन क्रमांक नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अचल मालमत्ता खरेदीसाठी २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांची उचल घेण्यास किंवा देण्यास बंदी घालण्यासाठी त्यांनी आयकर कायद्यात सुधारणा सुचविली आहे.